मुंबई/प्रतिनिधी
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल केलेल्या खळबळजनक वक्तव्यानंतर राज्यात शिवसेना विरुद्ध नारायण राणे वाद चिघळण्यास सुरुवात झाली आहे. राज्यभर राणेंच्या या विधानाचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी नारायण राणे यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. तर नाशिक पोलिसांचं एक पथक राणेंना अटक करण्यासाठी रवाना झालं आहे. दरम्यान, नारायण राणेंच्या या वक्तव्याबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.