ऑनलाईन टीम / पुणे :
जनआशिर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानशिलात लगावण्याची भाषा करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरुद्ध पुण्यातील चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवसेनेचे युवा चिटणीस रोहित कदम यांनी सोमवारी मध्यरात्री चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात राणेंविरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार या गुह्याच्या तपासाकामी शहर पोलीस दलातील दोन पोलीस अधिकारी चिपळूणला रवाना झाले आहेत. याबाबत सकाळी न्यायालयातून वॉरंट घेण्याची शक्मयता असून, न्यायालय नेमके कशा प्रकारचे वॉरंट बजावते, यावरुन पुढील प्रक्रिया अवलंबून आहे.
दरम्यान, राणेंवर याप्रकरणात नाशिक आणि महाडमध्येही गुन्हा दाखल करण्यात आला असून, नाशिक पोलिसांची एक टीम त्यांना अटक करण्यासाठी चिपळूणला रवाना झाली आहे. चिपळूनमध्ये राणेंची जन आशिर्वाद यात्रा सुरु आहे, तेथे हे पथक जाणार आहे. नारायण राणेंना अटक करुन कोर्टासमोर हजर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.