हेस्कॉम-केपीटीसीएल कर्मचाऱयांच्या कार्याकडे सरकारचे अद्यापही दुर्लक्षच : कोरोना योद्धा म्हणून दर्जा देण्याची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
नागरिकांना सुरळीत वीजपुरवठा मिळावा यासाठी रात्रंदिवस सेवा बजावणारे हेस्कॉम-केपीटीसीएलचे कर्मचारी कोरोना योद्धावाचून अद्याप उपेक्षित आहेत. आतापर्यंत बेळगाव विभागात शेकडो कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील अनेकजण दगावले आहेत. प्रत्येक घरोघरी सुरळीत वीजपुरवठय़ासाठी राबणाऱया या कर्मचाऱयांना अद्याप कोरोना प्रतिबंधक लसही मिळालेली नाही. त्यामुळे कर्नाटक राज्य सरकारने या कर्मचाऱयांना ‘कोरोना योद्धा’ म्हणून सरकारदरबारी नोंद करावी, अशी मागणी विद्युत कर्मचाऱयांकडून केली जात आहे.
कर्नाटक राज्य सरकारने इतर सरकारी कर्मचाऱयांना कोरोना योद्धा म्हणून दर्जा दिला आहे. पोलीस, डॉक्टर, स्वच्छता कर्मचारी, मनपा कर्मचारी यांसह इतर कर्मचाऱयांचा कोरोनाने मृत्यू झाल्यास त्यांना सरकारी मदत दिली जात आहे. परंतु कोरोनाबाधित होऊन विद्युत कर्मचाऱयांचा मृत्यू होऊनही त्यांना कोणतीही मदत मिळत नसल्याने विद्युत कर्मचारीवर्गामध्ये नाराजी आहे. सिव्हिल हॉस्पिटल, कोरोना सेंटर या ठिकाणी 24 तास वीजपुरवठा रहावा यासाठी धडपडणारे कर्मचारीच उपेक्षित असल्याचे यातून दिसून येत आहे. सरकारने कोरोना योद्धा म्हणून विद्युत कर्मचाऱयांना दर्जा द्यावा, यासाठी राज्यभरातील कर्मचारी पाठपुरावा करीत आहेत. तसा प्रस्तावही कर्मचारी संघटनेच्यावतीने मंत्रिमंडळाकडे दिला आहे.
विद्युत कर्मचाऱयांना अद्याप लसीकरण नाही
रात्रंदिवस सेवा बजावूनही अद्यापही विद्युत कर्मचाऱयांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आलेली नाही. 45 वर्षांखालील कर्मचाऱयांची संख्या अधिक आहे. परंतु सरकारी नियमानुसार त्यांना लस दिली जात नसल्याने कर्मचाऱयांचे आरोग्य धोक्मयात आले आहे. त्याचसोबत 45 वर्षांवरील कर्मचाऱयांना अद्याप दुसरी लस दिलेली नाही. त्यामुळे विद्युत कर्मचाऱयांना सर्वप्रथम लस द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
बेळगाव शहरात चौघांचा मृत्यू
नेहरुनगर येथील स्टेशनमध्ये काम करणाऱया कल्लाप्पा केदारी या 31 वषीय युवकाचे निधन झाल्याने ही बाब चटका लावून जाणारी होती. याचसोबत रेल्वेस्टेशन कार्यालयातील असिस्टंट अकौंट ऑफिसर संदीप किणेकर यांचाही तरुणपणीच दुर्दैवी मृत्यू झाला. याचसोबत ज्युनियर इंजिनिअर नदाफ, अकौंट ऑफिसर अंगडी यांचा काही दिवसांच्या फरकाने मृत्यू झाल्याने कर्मचाऱयांमधून हळहळ व्यक्त होत आहे.
कर्मचाऱयांना-कुटुंबीयांना आधार मिळेल
प्रत्येक महिन्याला घरोघरी जाऊन मीटर रीडिंग घेणारे कर्मचारी आता कोरोनाबाधित होत आहेत. कोरोनाच्या दुसऱया लाटेत आमचे सहकारी दगावत आहेत. कोरोनाकाळात उत्तम सेवा बजावूनही अद्यापही सरकारने कोरोना योद्धा म्हणून दखल घेतलेली नाही. राज्य सरकारने पंटलाईन वर्कर म्हणून समावेश केल्यास कर्मचाऱयांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार मिळेल.
-मारुती दोडमनी (ऑर्गनायझिंग सेपेटरी-केपीटीसीएल कर्मचारी संघटना बेळगाव)
सर्व कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून सरकारकडे मागणी
पंजाब, ओडिशा या राज्य सरकारांनी विद्युत कर्मचाऱयांचा प्रंटलाईन वर्कर म्हणून समावेश केला आहे. परंतु कर्नाटक सरकारने अद्याप याची दखल घेतलेली नाही. सर्व कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून सरकारकडे ही मागणी करण्यात आली आहे.
-दीपक डी. (ऑर्गनायझिंग सेपेटरी-केईबी इंजिनिअर्स असोसिएशन)
मीटर रीडिंग-दुरुस्तीसाठी घरोघरी जावे लागत असल्याने धोका वाढला
लॉकडाऊन तसेच कोरोनाचा संसर्ग असतानाही विद्युत कर्मचारी कामावर आहेत. सुरळीत वीजपुरवठा असल्यामुळेच कोरोना रुग्णांवर उपचार करता येतात. यामध्ये कोणताही खंड पडल्यास दुर्घटना घडण्याची शक्मयता आहे. यापूर्वी कंटेन्मेंट झोन केले जात असल्यामुळे कोरोनाबाधितांची माहिती मिळत होती. परंतु सध्या असे नसल्याने विद्युत कर्मचारी मीटर रीडिंग-दुरुस्तीसाठी घरोघरी जात असल्याने धोका वाढला आहे.
-नागराज पाटील (ऑर्गनायझिंग सेपेटरी-डिप्लोमा इंजिनिअर्स असोसिएशन)