बिशप डेरेक फर्नांडिस यांचे आवाहन
प्रतिनिधी / बेळगाव
जगाला प्रेम, बंधुता व शांततेची शिकवण देणाऱया येशूख्रिस्तांचा जन्म 25 डिसेंबरला झाला होता. यानिमित्त मागील शेकडो वर्षांपासून नाताळ सण साजरा केला जातो. परंतु यावषी कोरोना व सरकारी नियमावलीमुळे बंधने आली आहेत. रात्रीच्या कर्फ्यूमुळे नागरिकांनी सकाळी 7 ते रात्री 9.30 पर्यंत नाताळचा सण साजरा करावा, असे आवाहन बेळगाव डायोसिसचे बिशप डेरेक फर्नांडिस यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले.
बेळगाव परिसरात मोठय़ा उत्साहाने नाताळ साजरा केला जातो. ख्रिसमसपासून नववर्षाच्या स्वागतापर्यंत हा जल्लोष सुरू असतो. चर्चमध्ये सामूहिक प्रार्थना करण्यासाठी ख्रिस्तीबांधव मोठय़ा संख्येने जमत असतात. परंतु यावषी कोरोनामुळे उत्सवावर निर्बंध आले आहेत. रात्रीचा जन्मोत्सव कार्यक्रम व इतर पाटर्य़ा रद्द कराव्या लागल्या आहेत.
मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी दिलेल्या आदेशानुसार नाईट कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे रात्रीचे सर्व कार्यक्रम रात्री 9 पूर्वी केले जाणार आहेत. दि. 25 रोजी सकाळी 7.30 ते रात्री 9.30 या वेळेत सर्व कार्यक्रम होणार आहेत. नागरिकांनी सामूहिक प्रार्थनेसाठी चर्चमध्ये जाताना सामाजिक अंतर, मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.