मुंबई
भारतातील दिग्गज गुंतवणूकदार व उद्योगपती राधाकिशन दमानी हे जगातील 100 श्रीमंतांच्या यादीत समाविष्ट झाले आहेत. ब्लूमबर्गच्या बिलिनियर्स इंडेक्समध्ये त्यांचे स्थान 98 वे आहे. 1920 कोटी रुपयांच्या संपत्तीसह त्यांनी शंभरच्या यादीत प्रवेश मिळवला असून रिटेल चेनमधील डीमार्ट त्यांच्या मालकिचे आहे. या यादीत यांच्यासह मुकेश अंबानी, गौतम अदानी, अझीम प्रेमजी, शिव नाडर आणि लक्ष्मी मित्तल यांचीही नावे आहेत.