ऑनलाईन टीम / कोल्हापूर
राधानगरी धरणाचा आज सकाळी दरवाजा दरवाजा तब्बल 18 फुट खुला झाला आहे, त्यामुळे भोगावती नदी पात्रात वेगाने पाणी पातळी वाढत आहे. याच पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी घाबरू नका. धरणाचे दरवाजे दुरुस्तीचे पथक घटनास्थळी पोहोचतत आहे. तसेच पाटबंधारे विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारीही त्यांच्यासोबत असून देखरेख करत आहेत असे स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर धरणाच्या खालील भागात असणाऱ्या नागरीकांना सतर्क करण्यासाठी पब्लिक अॅड्रेसिंग सिस्टीमही कार्यान्वित करण्यात आली असून गावातील लोकांना सतर्क करण्यात येत आहे. त्याद्वारे संदेश जाहीर केले जात आहेत. असे ही जिल्हाधिकारी म्हणाले.
तसेच कोल्हापूर पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता महेश सुर्वे यांनी याविषयी खुलासा केला आहे. आज सकाळी दि. 29 डिसेंबर रोजी राधानगरी धरणाच्या दरवाज्याचे तांत्रिक काम करत असताना दरवाजा उघडून अडकला असल्यामुळे नदी पात्रात पाण्याचा अचानक विसर्ग वाढण्याची शक्यता असून यामुऴे पंचगंगेसह अनेक नद्यांच्या पाणी पातळीत दिवसभरात ३ ते ४ फूटाने वाढ होण्याची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच तंत्रज्ञानांनी यावर बोलताना स्टार्टर स्वीच अचानक शॉर्ट होवून गेट आपोआप सुरू झालाची शक्यता व्यक्त केली असून आज दिवसभरात कोणत्याही परिस्थितीत गेटची दुरुस्ती पूर्ण करण्याचा मानस व्यक्त केला. तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी पाटबंधारे खात्याची यंत्रणा जोरात कामाला लागली असून या दुरुस्तीसाठी अनेक पथके रवाना झाली आहेत.
सध्या के.टी वेअरचे पिलर काढण्याची सूचना संबंधितांना दिली आहे. त्याचबरोबर नदीतील पाणी वाढणार असल्याने नागरिकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. नदी काठावरील गाव, नदीवर जनावर,धुणे धुवायला जाणाऱ्या व्यक्तींनी आज नदीकडे जाण्याचे टाळून प्रशासनाला सहकार्य करावे. आज दिवसभरात या दरवाज्याची संपूर्ण दुरुस्ती करण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे असे अधिक्षक अभियंता महेश सुर्वे यांनी स्पष्ट केले आहे.