वार्ताहर / भुईंज
राधानगरी तालुक्यातील युवकाने नैराश्यपोटी दारूची नशा करून स्वत:वरच धारदार चाकूने शरीरावर ठिकठिकाणी वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला।
याबाबत भुईंज पोलीसाच्याकडून मिळालेली माहिती अशी की बोपेगाव ता।वाई येथील कांबळे नावाच्या शिवारात अनोळखी इसमाच्या गळयावर दोन्ही हातावर व पायावर जखमा झालेल्या अवस्थेत बेशुद्ध पडला असल्याची माहिती भुईंज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांना मिळाली। घटनेचे गार्भिय लक्षात घेत तात्काळ सपोनि आशिष कांबळे त्यांचे सहकारी हवालदार शंकर घाडग़े विजय अवघड़े सुनिल पोळ अतुल आवळे बापुराव धायगुड़े धनाजी कदम प्रसाद दुदुस्कर रविराज वर्णेकर इत्यादिंनी तात्काळ घटनास्थळी भेट देवून जखमीस सिव्हील हॉस्पीटल सातारा येथे पुढील उपचारासाठी दाखल करून त्याचे प्राण वाचवले। उपचारांनंतर जखमी प्रसाद रमेश कानेकर वय 25 रा। शेळकेवाडी ता।राधानगरी जि।कोल्हापूर याचेकडे सपोनि आशिष कांबळे यांनी चातुर्याने माहिती काढत काढत त्याने नैराश्यापोटी दारूची नशा केली होती। त्याच नशेत त्याने स्वत:जवळ असणारा चाकूने शरीरावर ठिकठिकाणी वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे कबूल केले।
या घटनेची नोंद भुईंज पोलीसात झाली असून अधिक तपास भुईंज पोलीस स्टेशनेचे सपोनि आशिष कांबळे करीत आहेत।