प्रतिनिधी / राधानगरी
धरण पाणलोट क्षेत्रात अद्याप पावसाची रिपरिप सुरू आहे. परिणामी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. राधानगरी धरण देखील पूर्ण क्षमतेने भरले आहे. यामुळे धरणाच्या स्वयंचलित दरवाज्यातून आता पर्यत चार वेळा पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.
आज पुन्हा पहाटे 5.19 वाजता गेट नंबर 6 व 5.21 वाजता गेट क्रं 3 खुले झाले. (347.45) त्यातून प्रत्येकी 1428 प्रमाणे 2856 व बी.ओ.टी.पाॅवर हाउस मधून 1400 असा एकूण 4256 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.