प्रतिनिधी / राधानगरी
देशात आणि राज्यात आलेल्या कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचा राधानगरीचा काजवा महोत्सव रद्द करण्यात आला आहे. दरवर्षी मे महिन्याच्या उत्तरार्धात राधानगरी व परिसरातील असंख्य झाडे हि काजव्यांनी बहरून जातात. रात्रीच्या वेळी दिसणारी हि काजव्यांनी आरास पाहायला राज्यातून पर राज्यातून अनेक पर्यटक,व अभ्यासक भाग घेत असतात पण सलग दुसऱ्या वर्षी आलेल्या या कोरोना लाटेमुळे यावर्षीचा काजवा महोत्सव रद्द करण्यात आला आहे. अशी माहिती बायसन नेचर क्लबचे अध्यक्ष सम्राट केरकर व उपाध्यक्ष रुपेश बोंबाडे यांनी दिली.
राधानगरी परिसरात वाढत असलेला कोरोना, बाहेरून येणाऱ्या पर्यटकांमुळे अजून वाढू शकतो तसेच सध्या राधानगरी परिसरातील अनेक व्यापारी, रिसॉर्ट मालक यांना सुद्धा कोरोनो ची लागण झाली आहे त्यामुळे पर्यटकांना पण त्यांचा त्रास होऊ शकतो, वन्यजीव विभागाने संपूर्ण जंगल परिसरात यापूर्वीच घातलेली बंदी व कडक लोकडाऊन मुळे पोलीस प्रशासनाने केलेले नियोजन यामुळे यावर्षी कुणीही काजवे पाहण्यासाठी या परिसरात येऊ नये . सर्वांनी घरी राहावे व सुरक्षित राहावे आम्ही आमच्या बायसन नेचर क्लब च्या फेसबुक पेज द्वारे 25 मे पासून काजवा महोत्सव संदर्भात माहिती देणारे वेगवेगळे व्हिडिओस प्रसारित करणार आहोत. असे आवाहन बायसन नेचर क्लब केले आहे.