ओटवणे / प्रतिनिधी:
कुणकेरी माणिक चौक येथील रहिवाशी राधाबाई गोविंद मडवळ (८५) यांचे सोमवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेत मडवळ कुटुंबियांचे सांत्वन केले. दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. निवृत्त वनपाल रामचंद्र मडवळ, सावंतवाडी संजीवनी हॉस्पिटल लगतचे हॉटेल चालक गणपत मडवळ, सालईवाडा येथील राकेश लॉन्ड्रीचे मालक कृष्णा मडवळ, कुणकेरी देवस्थान कमिटीचे खजिनदार तथा शाळा नंबर १ व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजन मडवळ यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात चार मुलगे, तीन मुली, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे.