मुंबई \ ऑनलाईन टीम
बॉलिवूड कलाकार सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणावरून ट्रोल होत असतात. कधी कपडयावरून तर कधी मेकअपवरून ट्रोलस त्यांच्यावर निशाणा साधत असतात. आपल्या ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाजासाठी प्रसिद्ध असलेली बॉलिवूडमधील मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली असून ‘#BoycottRadhikaApte’ हा ट्रेंड सध्या ट्विटरवर पाहायला मिळतोय. राधिकाच्या एका जुन्या चित्रपटातील न्यूड सीन दरम्यानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी राधिका आपटेच्या सिनेमांवर बहिष्कार घालण्याची मागणी केली आहे.
राधिकाच्या एका जुन्या सिनेमातील सीनमुळे तिच्यावर नेटकरी चांगलेच संतापले आहेत. राधिका आपटेच्या २०१६ सालामध्ये आलेल्या ‘पार्च्ड’ सिनेमातील न्यूड सीनचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सिनेमात राधिका आपटे आणि अभिनेता आदिल हुसैन यांच्यात एक न्यूड सीन होता. या सीनची त्यावेळी मोठी चर्चा झाली होती. या सीनमधील त्या न्यूड फोटोमुळे पुन्हा एकदा नेटकरी राधिकाला ट्रोल करत आहेत.
भारतीय संस्कती जपा असं म्हणत नेटकऱ्यांनी राधिकासह बॉलिवूडवर निशाणा साधला आहे. ‘बॉलिवूड भारतीय संस्कृतीचा नाश करत आहे’ अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.