‘अप्लाईड जिऑलॉजी’मध्ये एमएस्सीत यश
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगावच्या राधिका धर्मराज ज्युल्या यांनी एमएस्सी अंतिम परीक्षेत ‘अप्लाईड जिऑलॉजी’ या विषयात म्हैसूर विद्यापीठाची तीन सुवर्णपदके पटकाविली. त्यांनी तीन विषयात सर्वाधिक गुण घेतले असून त्या प्रा. एम. एन. विश्वनाथय्या, प्रा. जे. सी. व्ही. शास्त्री व सिद्धय्या लक्ष्मीदेवम्मा आणि केंपेगौडा निंगाप्पा अशा तीन सुवर्णपदकांच्या मानकरी ठरल्या आहेत.