दिशा पाटनीसोबत दिसून आला सलमान
मागील एक वर्षापासून बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान याचा आगामी चित्रपट ‘राधेः योर मोस्ट वाँटेड भाई’च्या प्रदर्शनाची प्रतीक्षा केली जात आहे. आता चित्रपटाच्या ट्रेलरनंतर याचे धमाकेदार डान्स नंबर ‘सीटी मार’चा व्हिडिओही सादर करण्यात आला आहे. या गाण्याला मोठी पसंती मिळत असून युटय़ूबवर लाखो प्रेक्षक लाभले आहेत.
सलमान आणि दिशा पाटनी या गाण्यात नृत्य करताना दिसून येत आहेत. या गाण्याला कमाल खान आणि यूलिया वंतूरने आवाज दिल आहे. गीत शब्बीर अहमद यांनी लिहिले असून याला संगीत मूळ तेलगू गाण्याचे संगीत दिग्दर्शक रॉकस्टार डीएसपी (देवी श्री प्रसाद) यांनीच दिले आहे.
अल्लू अर्जुन आणि पूजा हेगडे यांचा तेलगू चित्रपट डीजे दुवड्डा जगन्नाथम मधील मूळ गाण्याचा हा हिंदी रिमेक आहे. हे गाणे प्रदर्शित होताच दोन्ही गाण्यांच्या व्हिडिओची चाहते तुलनाही करत आहेत. ‘राधे’ चित्रपटात सलमान आणि दिशासह रणदीप हुड्डा तसेच जॅकी श्रॉफ हे मुख्य भूमिकेत आहेत. याचे दिग्दर्शन प्रभूदेवा यांनी केला आहे. चित्रपट 13 मे रोजी प्रदर्शित केला जाणार आहे.