बेंगळूर
बांधकाम क्षेत्रातील राधे डेव्हलपर्सच्या समभागांनी गेल्या काही कालावधीमध्ये गुंतवणूकदारांना उत्तम परतावा दिला आहे. गेल्या सहा महिन्याच्या काळामध्ये कंपनीच्या समभागाला अनेकदा अप्पर सर्किट लागला आहे. अप्पर सर्किट लागणे याचा अर्थ कंपनीचे समभाग मोठय़ा प्रमाणात खरेदी झाले असा होतो. मागच्या आठवडय़ामध्ये सदरच्या समभागाच्या भावामध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली होती. कंपनीचा समभाग शेअर बाजारात 338 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या सहा महिन्यांपूर्वी याच समभागाचा भाव 10 रुपये 40 पैसे इतका होता.