प्रतिनिधी / खानापूर
खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्यातील गवाळी गावाजवळ रानडुकराच्या हल्ल्यात वृद्ध महिला जखमी झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली.
सदर महिलेचे नाव सावित्री बापू गावडा (वय 75) असे आहे. ती गुरुवारी दुपारी गावापासून हाकेच्या अंतरावर जनावरे चारण्यासाठी गेली होती. यावेळी पिल्लांसह आलेल्या डुकराने महिलेवर अचानक हल्ला केला. डुकराचे सुळे तिच्या पायात घुसल्याने तिने आरडाओरड केली. यावेळी धावून आलेल्या लोकांनी त्या महिलेची डुकराच्या हल्ल्यातून सुटका केली. याची माहिती वनखात्याला मिळताच वनअधिकारी घटनास्थळी आले. त्यानंतर महिलेला उपचारासाठी खानापू सरकारी दवाखान्यात दाखल केले आहे.