वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय महिला मुष्टीयोद्धय़ांसाठी नियुक्त केलेले हाय परफॉर्म्नस डायरेक्टर (एचपीडी) इटलीचे राफाएल बर्गामास्को भारतात परत येण्यासाठी सज्ज झाले आहेत. व्हिसा संदर्भातील पुर्तता झाल्यानंतर राफाएल भारतात दाखल होणार असल्याचे अखिल भारतीय मुष्टीयुद्ध फेडरेशनच्या प्रवक्त्याने सांगितले.
राफाएल यांच्या पत्नीला कर्करोगाची बाधा झाली होती. त्यांच्या पत्नीची प्रकृती अधिक बिघडल्याने राफाएल इटलीला गेले होते. त्यांच्या पत्नीच्या प्रकृतीमध्ये चांगलीच सुधारणा होत आहे. आता राफाएल काही दिवसांतच भारतात दाखल होणार आहेत. भारतीय महिला मुष्टीयोद्धी मेरी कॉम तसेच लवलिना यांना राफाएल यांचे मार्गदर्शन मिळत आहे.