ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी मंगळवारी सकाळी राफेल मुद्द्यावरून ट्विट करत केंद्र सरकारवर टीका केली आहे. आपल्या या ट्विटमध्ये त्यांनी पद्य स्वरूपात काही ओळी देखील लिहिल्या आहेत.
राहुल गांधी यांनी ट्विटच्या सुरुवातीला गाळलेल्या जागा भरा… असे म्हटले आहे. राफेल लढाऊ विमानांच्या वादग्रस्त व्यवहारावरून काँग्रेसने जोरदार विरोध केला आहे. मोदी संयुक्त संसदीय समितीच्या चौकशीला तयार का होत नाहीत असा सवाल राहुल गांधी यांनी केला होता.
राफेल विमाने खरेदी बाबत हिंदुस्थानने फ्रान्स बरोबर 59 हजार कोटींचा चौकशीच्या फेऱ्यात अडकला आहे. फ्रान्स कडून याची न्यायालयीन चौकशी सुरू आहे. या दरम्यान राहुल गांधी यांनी मोदी सरकारला पुन्हा घेरले आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, खालील गाळलेले शब्द भरा… ‘ मित्रो ‘ वाला राफेल आहे, टॅक्स वसुली, महाग झालेले तेल आहे. पीएसयू पीएसबी ची अंधी सेल आहे आणि प्रश्न विचारले तर जेल आहे, मोदी सरकार …. आहे, असे आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
यापूर्वी राहुल गांधी यांनी इंस्टाग्राम वर एका व्यक्तीचा अर्धा चेहरा पोस्ट करत त्यावर चोर की दाढी असे म्हटले होते. त्यांनी त्यात कोणाचे नाव घेतले नाही. मात्र, छायाचित्रातील दाढी पंतप्रधान मोदी यांचीच आहे असे दिसत आहे.