वृत्तसंस्था/ मेलबोर्न
येथे सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेच्या प्रमुख ड्रॉ मध्ये स्थान मिळविण्यासाठीच्या पात्र फेरीच्या स्पर्धेत भारताच्या रामकुमार रामनाथन आणि अंकिता रैना यांनी दुसऱया फेरीत प्रवेश मिळविला आहे.
पुरूष एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात रामकुमार रामनाथनने अर्जेंटिनाच्या बॅगनीसचा 7-6 (8-6), 7-5 असा पराभव करत दुसरी फेरी गाठली. रामकुमारला विजयासाठी तब्बल दोन तास झगडावे लागले. महिला एकेरीच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात भारताच्या अंकिता रैनाने हंगेरीच्या रेका जेनीचा 6-2, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये 67 मिनिटांच्या कालावधीत पराभव करत पुढील फेरी गाठली. 8 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱया ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत भारताचा एकमेव टेनिसपटू सुमीत नागलला पुरूष एकेरीच्या प्रमुख ड्रॉ मध्ये वाईल्डकार्डद्वारे प्रवेश देण्यात आला आहे.