वृत्तसंस्था/ पॅरीस
प्रेंच ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेच्या पुरूष एकेरीच्या प्रमुख ड्रॉमध्ये स्थान मिळविण्याचे रामकुमार रामनाथनचे स्वप्न अधुरे ठरले. पात्र फेरीच्या सामन्यात फ्रान्सच्या लेमासिनेने रामकुमारचा पराभव केला.
पात्र फेरीच्या सोमवारी झालेल्या पहिल्या सामन्यात फ्रान्सच्या वाईल्ड कार्डधारक लेमासिनेने रामकुमार रामनाथनचा 7-5, 6-2 असा पराभव केला. हा सामना दीड तास चालला होता. या लढतीत रामकुमारने पहिल्या सेटमध्ये चारवेळा आपली सर्व्हिस गमाविली. आता पी. गुणेश्वरन हा एकमेव भारतीय टेनिसपटू या स्पर्धेत आपले आव्हान जिवंत राखण्यासाठी प्रयत्न करीत आहे. 2015 सालापासून प्रेंच ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत भारताच्या एकाही टेनिसपटूला पुरूष एकेरीच्या प्रमुख डॉमध्ये स्थान मिळविता आले नाही.