प्रतिनिधी / पणजी
तामिळनाडू येथील अरियालूर बस स्थानकाचे भाजी मार्केटमध्ये रूपांतर करण्यासाठी रामको सिमेंट कंपनीने निर्जंतुकीकरण बोगदा तयार केला आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्याची माहिती रामको सिमेंट कंपनीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
बस स्थानकात उभारण्यात आलेल्या भाजी मार्केटमध्ये जाताना या रामको निर्जंतुकीकरण बोगद्यातुन जावे लागते ज्यात औषधाची फवारणी होते. अंगावरील कोरोना तसेच इतर विषाणुता नाश केला जातो, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. अरिपालूरचे आमदार टी. राजेंदीरन यांच्या हस्ते या व्यवस्थेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी स्थानिक जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व इतर अधिकारी उपस्थित होते. असा प्रयोग इतर राज्यातही करण्याचा मानस या प्रसिद्धीपत्रात व्यक्त करण्यात आला आहे.