वार्ताहर / हिंडलगा
हिंडलगा ग्राम पंचायत निवडणुकीसाठी वॉर्ड क्रमांक 2 मधून ग्राम विकास लोकशाही आघाडीतर्फे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीला उभे असलेले उमेदवार व माजी ग्रा. पं. उपाध्यक्ष रामचंद्र आण्णाप्पा मन्नोळकर यांच्या प्रचाराला प्रारंभ झाला असून मतदार व ग्रामस्थांचा भरघोस पाठिंबा मिळत आहे.
एक सामाजिक कार्यकर्ता ते हिंडलग्यासह तालुक्याच्या राजकारणात सक्रिय असलेले रामचंद्र मन्नोळकर हे हिंडलगा ग्राम पंचायत सदस्यपदी सलग तीन वेळा निवडून आले आहेत. सामाजिक तळमळ व लोकसहभागामुळे त्यांनी आपले वेगळेच स्थान निर्माण करत यापूर्वी ग्रा. पं. चे अध्यक्षपद देखील भूषविले आहे. याशिवाय विविध सामाजिक, सहकारी व शैक्षणिक संघटनांमध्ये देखील ते कार्यरत राहून युवक व ग्रामस्थांना प्रोत्साहन देण्याचे कार्य करण्यात सदैव तत्पर असतात.
मागील कार्यकाळात केवळ राजकारणच न करता संपूर्ण गावचा विकास करून घेण्यावर भर दिला. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये ते अत्यंत लोकप्रिय बनले असून प्रचारादरम्यान मतदारांचा लाभणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हेच त्यांच्या कार्याची प्रचिती करून देते.
मंगळवार दि. 16 रोजी सायंकाळी ग्राम विकास लोकशाही आघाडीच्या इतर उमेदवारांसह रामचंद्र मन्नोळकर यांच्या जाहीर प्रचाराला त्यांच्या घरासमोरून सुरुवात करण्यात आली. या दरम्यान प्रत्येक मतदाराच्या घरोघरी जाऊन भेटी घेत बहुमताने निवडून आणल्याची विनंती करण्यात आली. यावेळी मतदारांनी देखील मन्नोळकर यांना आपला भरघोस पाठिंबा दर्शवून प्रचंड मतांनी निवडून आणण्याचा निर्धार केला
आहे.
यावेळी ग्राम विकास लोकशाही आघाडीचे सर्व उमेदवार, समर्थक व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित
होते.