जिल्हा बँक उपाध्यक्ष सुरेश दळवी यांचे ते मेहुणे
दोडामार्ग / वार्ताहर:
कोनाळ येथील रामचंद्र तुकाराम सावंत (वय – 46) यांचे नुकतेच हृदय विकाराच्या झटक्याने राहत्या घरीच निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी, चार विवाहित बहिणी असा परिवार आहे. रामचंद्र सावंत यांना क्रिकेटची फार आवड होती. टीव्हीवर क्रिकेट मॅच पहातानाच त्यांना हृदय विकाराचा झटका आला होता. जिल्हा बँक उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते सुरेश दळवी यांचे ते मेहुणे होत. त्यांच्या या अचानक झालेल्या निधनाने तिलारी पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.