वार्ताहर/ रामदुर्ग
संगोळ्ळी रायण्णा यांचे देशप्रेम, धैर्य, साहस हे गुण आजच्या युवापिढीस मार्गदर्शक असल्याचे मत आमदार महादेवप्पा यादवाड यांनी व्यक्त केले. शहरानजीकच्या संगोळ्ळी रायण्णा सर्कलमध्ये 15 ऑगस्ट रोजी संगोळ्ळी रायण्णा यांच्या पुतळय़ाचे अनावरण करून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी तुरनूर ग्रा. पं. अध्यक्ष लकप्पा क्वारी तर दिव्यसान्निध्यपदी मुगळखोड मठाचे चिन्मय स्वामीजी होते.
समाजाचे ज्ये÷ नेते के. मुखडप्पा, बेंगळूर येथील प्रसिद्ध उद्योगपती चिक्करेवण्णनवर, तालुका घटकाचे अध्यक्ष विठ्ठल जटगण्णवर आदींनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी वेणू मैलारी, जि. पं. सदस्य रेणप्पा सोमगोंड, मारुती तुप्पद, शिवक्का बेळवडी, एपीएमसी अध्यक्ष दशावप्पा बेळवडी, तहसीलदार गिरीश स्वादी, मल्लण्णा यादवाड, निलप्पा चाकलब्बी, केंपण्णा क्वारी, रवि मोरबद, फकिरप्पा कोंगवाड, जगदीश कामण्णावर, यमनप्पा गोडची आदी उपस्थित होते.