वार्ताहर/ रामदुर्ग
रामदुर्ग तालुका ब्राह्मण समाजाकडून गणेशोत्सवाच्या आयोजनासोबत अयोध्येस गेलेल्या करसेवकांचा सत्कार करण्यात आला. रामदुर्ग येथून करसेवेस गेलेल्या मल्लिकार्जुन भाविकट्टी, रमेश प्रभू, दत्ता नायक व गोविंद मोडक यांचा सत्कार करण्यात आला.
सत्काराचा स्वीकार करीत मल्लिकार्जुन भाविकट्टी, रमेश प्रभू व दत्ता नायक यांनी विविध प्रसंगांचा अनुभव यावेळी सांगितला. जि. पं. सदस्य रमेश देशपांडे यांनी आपले मत व्यक्त केले. तालुका ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी (बशीडोणी), गुरु राघवेंद्र भजन मंडळाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी (शिरसंगी), डॉ. सुरेश कुलकर्णी, मण्णूर गुरुजी, गोपाल बिंदगी, वे. मु. उल्हास गोडबोलेंसह ब्राह्मण समाजाचे पदाधिकारी, समाजबांधव उपस्थित होते. स्वागत स्वाती गड, आभार पवन देशपांडे यांनी मानले.