लग्नसमारंभ आटोपून मुंबईहून परतलेल्या महिलेला लागण
प्रतिनिधी/ बेळगाव
शिवपेठ (ता. रामदुर्ग) येथील एका गर्भवती महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. शनिवारी दुपारी राज्य आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये यासंबंधीची माहिती देण्यात आली असून त्या 27 वषीय महिलेला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जिह्यातील बाधितांची संख्या 121 वर पोहोचली आहे.
आपले वडिल व मुलांसमवेत एका लग्न समारंभासाठी ही महिला मुंबईला गेली होती. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर ई-पास मिळवून हे कुटुंबिय सुरुवातीला सिंधगी तालुक्मयातील (जि. विजापूर) रामपूर या गावी पोहोचले. रामपूर हे या महिलेचे माहेर आहे.
तेथून 11 मे रोजी ही महिला आपल्या मुलांसमवेत शिवपेठला पोहोचली. तेथील गावकऱयांनी गावात तिला क्वारंटाईनमध्ये ठेवण्यास विरोध केल्यामुळे या महिलेला रामदुर्ग येथील बिसीएम हॉस्टेलमध्ये ठेवण्यात आले होते. शनिवारी तिचा स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तिच्या थेट संपर्कात असलेले पती, सासु, सासरे, दोन मुले यांना रामदुर्गमध्ये क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.
ही 27 वषीय महिला चार महिन्यांची गर्भवती आहे. शनिवारी दुपारी स्वॅब तपासणी अहवाल जाहीर झाल्यानंतर या महिलेला रुग्णवाहिकेतून सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात आले. रामदुर्गला जाण्यापूर्वी ही महिला सिंधगी तालुक्मयातील आपल्या माहेरी गेली होती. आता तिच्या माहेरवासीयांचीही माहिती मिळविण्यात येत आहे.
रुग्ण क्रमांक 1814 असलेल्या महिलेची काळजी घेण्यात येत आहे. तबलिगी व अजमेर कनेक्शननंतर मुंबईहून परतणाऱयांमुळे कोरोनाचा फैलाव वाढतो आहे. शनिवारी राज्यात एका दिवसांत 216 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून कर्नाटकातील एकूण बाधितांचा अकडा 959 पोहोचला आहे.
चार गर्भवती महिलांना कोरोनाची लागण
बेळगाव जिह्यातील एकूण बाधितांची संख्या 121 वर पोहोचली आहे. यापैकी चार गर्भवती महिलांचा समावेश आहे. या चौघीही मुंबईहून बेळगावला परतल्या आहेत. गेल्या आठवडय़ात मुंबईहून आलेल्या सदाशिवनगर येथील एका गर्भवती महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर मुंबईहून गावी परतलेल्या हुक्केरी तालुक्मयातील दोन गर्भवती महिलांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. शनिवारी शिवपेठ (ता. रामदुर्ग) येथील गर्भवती महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या चारही महिलांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत.
चौघा जणांवर एफआयआर
महाराष्ट्रातून बेळगावला येण्यासाठी पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी तपासनाक्मयावर आलेल्या व नंतर सीपीएड मैदानावर यासंबंधीची माहिती न देणाऱया चौघा जणांवर येथील कॅम्प पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चौघा जणांनी आपल्या संबंधीची माहितीही व्यवस्थीतपणे दिली नाही. कोगनोळी येथून आल्यानंतर सीपीएड मैदानावर बेळगावला आल्याचे सांगून सरकारी यंत्रणेकडे त्याची नोंद करायला हवी होती. 18 मे पासून त्यांनी याकडे फिरकलेच नाहीत. म्हणून पालिआ आयुक्तांनी या चौघा जणांविरुध्द फिर्याद दिली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मात्र त्यांनी आपल्या विषयाची व्यवस्थीत माहिती दिली नाही. त्यामुळे त्यांचा शोध घेणे कठीण जात आहे.