रात्री 12.30 पर्यंत चालली मतमोजणी : उमेदवारांसह समर्थकांचा जल्लोष
वार्ताहर/ रामदुर्ग
तालुक्मयातील 33 ग्राम पंचायतींची मतमोजणी येथील इरम्मा यादवाड प्रथम दर्जा महाविद्यालयात रात्री 12.30 पर्यंत झाली. विजयी उमेदवारांचे नाव घोषित होताच समर्थकांनी फटाके व गुलालाची उधळण तसेच मिठाईचे वाटप करून आनंदोत्सव साजरा केला. तालुक्मयात भाजप पुरस्कृत सदस्य मोठय़ा संख्येने निवडून आले आहेत. आता अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
कटकोळ ग्रा. पं. वॉर्ड क्र. 6 मधून करियप्पा गुदगन्नावर व श्रीकांत कोरवर या दोघांना प्रत्येकी 90 मते मिळाल्याने तहसीलदारांनी चिठ्ठी उधळून निवड केली. यात श्रीकांत कोरवर यांचे नाव आल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. तालुक्मयातील बटकुर्की ग्रा. पं. वॉर्ड क्र. 3 मधून व्यंकटेश वज्रमट्टी व त्यांचा जावई श्रीनिवास बानी या दोघांनी एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकला होता. व्यंकटेश काँग्रेस पुरस्कृत तर श्रीनिवास हे भाजप पुरस्कृत उमेदवार होते. यात जावईवर सासरा वरचढ ठरला असून व्यंकटेश विजयी झाले आहेत.
तालुक्मयातील होसकेरी ग्रा. पं. निवडणुकीत बीडीसीसी बँकेचे माजी उपाध्यक्ष बी. एस. बेळवणकी विजयी झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी बीडीसीसी बँकेच्या निवडणुकीत बेळवणकी यांचा केवळ 3 मतांनी पराभव झाला होता. कंदापूर ग्रा. पं. वॉर्ड क्र. 6 मधून सामान्य महिला गटातून निर्मला खानपेठ या विजयी झाल्या. 27 रोजी झालेल्या मतदानादिवशी निर्मला खानपेठ यांना बादली खूण देण्यात आली होती. पण, मतपत्रिकेमध्ये त्यांच्या नावासमोर टेझरी (कपाट) खूण दाखविल्याने ही निवडणूक 29 रोजी घेण्यात आली होती.