9 जागा बिनविरोध : 7 अर्ज अवैध
वार्ताहर/ रामदुर्ग
सध्या सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहत असून उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता बुधवार 16 रोजी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मोठय़ा संख्येने उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले असून आता शनिवार 19 रोजी अर्ज माघार घेण्यात येणार आहे. यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असून प्रचार सुरुवात होणार आहे. दरम्यान, तालुक्यात 27 रोजी 33 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होणार असून 520 जागांसाठी 1736 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये 7 अर्ज अवैध ठरले असून 9 जागांवर प्रत्येकी एक अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.
हणमसागर ग्रा. पं. वॉर्ड क्र. 1 परिशिष्ट जात महिला राखीव सावित्री भंड्डीवड्डर, चिंचनूर वॉर्ड क्र. 6 परिशिष्ट जमात महिला राखीव भीमव्वा पुजेर, जुने तोरगल वॉर्ड क्र. 2 परिशिष्ट जात महिला राखीव इरव्वा लमाणी, वॉर्ड क्र. 3 परिशिष्ट जात महिला धर्मव्वा चव्हाण, सामान्य रणजित जगताप, के. चंदरगी वॉर्ड क्र. 6 मागास अ वर्ग महिला राखीव पौर्णिमा पडसलगी, सालापूर वॉर्ड क्र. 6 (दाडीभांवी तांडा) ज्योती लमाणी व व्यंकटापूर वॉर्ड क्र. 10 मधून रेवक्का पट्टण यांचा एक अर्ज दाखल झाला असून या सर्वांची बिनविरोध निवड झाली आहे.