वार्ताहर / रामदुर्ग
माजी आमदार अशोक पट्टण यांच्या निवासस्थानी काँग्रेस पक्षाचा 136 वा स्थापना दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते म्हणाले, सर्वांना समान न्याय व समानतेची शिकवण दिलेला पक्ष म्हणजे काँग्रेस होय. काँग्रेस पक्षामुळे देशाचा सर्वांगीण विकास झाल्याचे अशोक पट्टण यांनी सांगितले. नगर परिषद सदस्या ऍड. राजेश्वरी मेटगुड म्हणाल्या, भारत देश विशालपणे वाढण्यास व देशाला विकासाभिमूख करण्यासाठी काँग्रेस पक्षाने मोठी मेहनत घेतली आहे. यापुढे विकासाचे ध्येय ठेवून तालुक्यात पक्ष संघटना बळकट करून एकत्रितरित्या काम करुया, असे त्यांनी सांगितले.
यावेळी नगरसेविका सदस्या संगीता रायबाग, शंकर सुळेभावी, दुरगप्पा भंडीवड्डर, इमाम हुसेन कलादगी, राजू मुदकवी, माजी नगराध्यक्ष हुसेनबाशा मोरब, नवीन गदग, रेमश भंडीवड्डर, हणमंत कोटरी, तुकाराम बलकुंदी यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.