रामनगर
रामनगर-कारवार मार्गावरील पेट्रोलपंपनजीक दोन दुचाकी अपघातात तीन जण जखमी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी 5 वाजता घडली. त्यामध्ये दत्ता बेळगावकर (वय 42, रा. असू) हा रामनगर येथून असूला जात होता. तर आनंद मिराशी (वय 30, रा. दुर्गाहट्टी) व तुलसीदास गावडे (वय 34, कामरा ता. जोयडा) हे जगलबेट येथून रामनगरच्या दिशेला येत होते. त्यांची दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने त्यांना रामनगरमध्ये उपचार करून दत्ता बेळगावकर तसेच आनंद मिराशी यांना अधिक उपचारासाठी नेण्यात आले. घटनेची नोंद रामनगर पोलीस स्थानकात झाली आहे..