रामनगर : येथील प्राथमिक शाळेत कोरोना योद्धय़ांचा सत्कार करण्यात आला. शाळेतील भारत स्काऊट गाईड यांच्यावतीने या योद्धय़ांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्य खात्याच्या तालुका अधिकारी डॉ. उक्कळी, भारत स्काऊट गाईडचे आयुक्त एम. एम. भट्ट, क्षेत्रशिक्षणाधिकारी हिरेमठ, शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष यशवंत नाईक, उपाध्यक्षा सुलभा गावडे, हरिकंत, सीआरपी विनायक हेगडे, मुख्याध्यापक मिराशी उपस्थित होते. डॉ. उक्कळी बोलताना म्हणाले की, कोरोना विरोधात लढण्यासाठी आरोग्य खात्याने बरेच परिश्रम घेतले. याला इतर खात्यांचेही सहकार्य मिळाले. शेवटी सत्काराबाबत त्यांनी आनंद व्यक्त करून आभार मानले. ललीनी हेगडे यांनी शिस्त व देशाभिमान हा लहान वयातच मुलांच्या अंगी मुरवावा लागतो. यासाठी भारत स्काऊट या शाखेची येथे गरज होती, असे सांगितले. कार्यक्रमाला भारत स्काऊट शाखेच्या शोभा डी. सी., एसडीएमसी अध्यक्ष बापू देसाई तसेच सदस्य, शाळेतील शिक्षक उपस्थित होते. काजूगर यांनी आभार मानले.
Previous Articleकारवार येथील आंदोलन सातव्या दिवशीही सुरूच
Next Article राजस्थानमधील 8 शहरांमध्ये आजपासून ‘नाईट कर्फ्यू’
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.