बेळगाव / प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रामनवमीचा उत्सव घरच्या घरीच साधेपणाने करा, तुम्ही अंत:करणापासून केलेली प्रार्थनाच महत्त्वाची आहे. देशावरचे आणि जगावरचे कोरोनाचे संकट टळू दे, इतकी प्रार्थना नक्की करा, असे आवाहन जे÷ पुरोहित वासुदेव छत्रे यांनी केले.
गुरुवारी रामनवमी आहे. दरवषी शहरातील राम मंदिरांमधून रामनवमी साजरी केली जाते. रामनवमीचा मोठा उत्सव साजरा केला जातो. सध्या कोरोनामुळे हा उत्सव साजरा करता येणार नाही. सद्य परिस्थितीत घरच्या घरीच 12 ते 12.30 दरम्यान रामाच्या प्रतिमा ठेवून पूजा करा, आरती करा, घरातल्या मंडळींनीसुद्धा परस्परांत अंतर ठेवून आरती करावी, आणि घरापुरताच सुंठवडा प्रसाद म्हणून द्यावा, असेही छत्रे यांनी नमूद केले.