प्रतिनिधी /पणजी
मंगेशी येथील गोमंतकीय कवी व लेखक रामनाथ पंढरी गावडे यांना कै. बसवंत नागु शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट, बेडकीहाळ (कर्नाटक) यांच्या वतीने देणारा 2022 सालाचा राष्ट्रीय आदर्श समाजरत्न गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. हा राष्ट्रीय पुरस्कार ट्रस्टच्या वतीने समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना देऊन या पुरस्काराने गौरविले जाते.
सदर पुरस्कार वितरण सोहळा 21 जानेवारी 2022 रोजी नियाज हा?टेल हा?ल, बेळगाव येथे प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत होणार आहे. कोल्हापूरी फेटा, श्रीफळ, सन्मानचिन्ह, गौरव पत्र, व पदक असे पुरस्काराचे स्वरूप आहे. गावडे हे सध्या गोवा कारागृहात सहाय्यक तुरुंग अधिकारी म्हणून कार्यरत आहे.