विश्व हिंदू परिषदेचे आवाहन
प्रतिनिधी / पणजी
आयोध्येत बुधवारी दि. 5 ऑगष्ट रोजी होणाऱया राममंदिर भूमिपूजनदिनी गोव्यातील जनतेने आपापल्या घरी गुढय़ा उभाराव्यात आणि मंदिर उभारणीचे स्वागत करावे, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेने (गोमंतक) केले आहे.
परिषदेचे गोव्यातील प्रमुख पदाधिकारी मधुकर द्नाक्षित यांनी पत्रकारांशी बोलताना वरील माहिती दिली. भूमिपूजन सोहळा सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत दूरदर्शन व विविध वाहिन्यांवर जनतेने पाहावा. घरी किंवा जवळच्या मंदिरात श्रीराम दैवताचे पूजन करावे तसेच कोरोना महामारीतून मुक्त करण्यासाठी गाऱहाणे घालावे. राममंदिराचे काम त्वरित पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करावी, असे त्यांनी सांगितले.
सायंकाळी घरात दिव्यांची आरास करावी. ‘श्रीराम जय राम’ या नावाचा जप करण्यात यावा. मोठय़ा पडद्यावर भूमिपूजनाचा सोहळा दाखवण्याची व्यवस्था करावी. भूमिपूजनानंतर दीपोत्सव साजरा करण्यात यावा. मंदिरासाठी दान-धर्म करण्याचा संकल्प सोडावा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा सोहळा पोहोचावा म्हणून सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन परिषदेतर्फे करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेला लक्ष्मण बेहेरे, संतोष महानंदू नाईक आदी उपस्थित होते.