प्रतिनिधी/ सातारा
विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक – निंबाळकर यांचे आणि खासदार उदयनराजे यांचे एकेकाळी वाद विकोपाला गेले होते. परंतु दोन महिन्यापूर्वी दोघेही शासकीय विश्रामगृहावर भेटले अन् वाद मिटला, क्षमला अन् थांबलाही. पुन्हा या दोघांची अचानक भेट पुण्यात एका विवाह सोहळयात भेट झाली. खासदार उदयनराजेंनीच त्यांच्याशी आपुलकीने हास्य करत विचारणा केली.
खासदार उदयनराजे यांचे आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे यांचे वैचारिक संबंध जुनेच परंतु मध्यंतरीच्या काळात दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झाले होते. दोघांनीही एकमेकांच्या विरोधात टोकाची भूमिका घेतली होती. तो वाद वाढला होता. हेच दोन्ही राजे जिह्याच्या राजकारणात महत्वाच्या स्थानी आहेत. गेल्या दोन महिन्यापूर्वी शासकीय विश्रामगृहात दोघांच्यात भेट झाली. खासदार उदयनराजे आणि विधानपरिषदेचे सभापती रामराजे यांच्यातली दुसरी भेट पुण्यात नुकतीच झाली. पुण्यात एका प्रतिष्ठीत घरातील विवाह सोहळा होता. या सोहळय़ाला रामराजे यांनी हजेरी लावली होती. अचानक तेथे खासदार उदयनराजे यांची दमदार एन्ट्री झाली अन् त्यांनी आपल्या स्टाईलमध्ये रामराजेंशी हितगुज केले. आपलुकीने विचारणा केली. त्यांच्या या हितगुज व चर्चेविषयी चर्चा रंगली होती.