प्रतिनिधी /पणजी
सांतआंद्रे मतदारसंघातील 201 मधील विधानसभा निवडणुकीचे भाजप उमेदवार रामराव वाघ यांनी ‘आप’ पक्षात प्रवेश केला असून भाजपला रामराम ठोकला आहे. आपच्या गोवा प्रभारी अतिथी यांच्या हजेरीत त्यांचा हा प्रवेश झाला असून ते त्या मतदारसंघातून आपचे उमेदवार या नात्याने रिंगणात उतरतील असा अंदाज आहे.
दरम्यान, तेथील आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांनी मतदारसंघात काहीच विकासकामे केली नाहीत, असा आरोप श्री. वाघ यांनी केला असून त्यांना टक्कर देण्यासाठीच आप हा योग्य पर्याय आहे. म्हणूनच आपमध्ये सामील झाल्याचे ते म्हणाले.