प्रतिनिधी/ बेळगाव
रामलिंगखिंड गल्ली येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांचे पार्किंग केले जात आहे. त्यामुळे व्यापारी व स्थानिक रहिवासी हैराण झाले आहेत. त्यातच शनिवारी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहने लावण्यात आल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे या बेशिस्त वाहन पार्किंग करणाऱयांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
शनिवारी चित्रपट पाहण्यासाठी तरुण-तरुणी आल्या होत्या. त्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दुचाकी वाहने लावली. यामुळे चारचाकी वाहने येणे-जाणे कठीण झाले. एरव्ही रामलिंगखिंड गल्ली कॉर्नर येथे वाहतुकीची कोंडी होत आहे. एका मागे एक अशी दोन वाहने पार्किंग केली जात आहेत. यामुळे वाहतूक कोंडीमध्ये अधिकच भर पडत आहे. सायंकाळी 6 ते 8 यावेळेत तर वाहतूक नियंत्रण करणे कठीण होत आहे. याचा परिणाम स्थानिक व्यापारावर होताना दिसत आहे.
किर्लोस्कर रोड कॉर्नरपासून टिळक चौकापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी बेशिस्त पद्धतीने वाहने पार्किंग केली जातात. त्यातच काही विपेते आपली दुकाने थाटत असल्यामुळे दुचाकी वाहने रस्त्यावर पार्क केली जात आहेत. यामुळे वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागतो. या बेशिस्त पार्किंगला आता शिस्त लावण्याची गरज निर्माण झाली आहे.