प्रतिनिधी/ बेळगाव
अयोध्या येथील राम मंदिर येणाऱया काळात निर्माण होणार आहे. त्यासाठी प्रत्येकाचा सहभाग हवा आहे. याबद्दल सविस्तर माहिती रामनाथ नायक, सुशांत जोशी यांनी दिली. हमारा देश संघटनेतर्फे अयोध्येतील राम मंदिर निर्माणच्या संदर्भात विविध हिंदू संघटनांची बैठक घेतली. ठळकवाडी हायस्कूलच्या सभागृहात ही बैठक घेण्यात आली.
दरवषी दिवाळीच्या शुभेच्छा देण्याबरोबरच चर्चा करण्यासाठी विविध संघटनांच्या माध्यमातून ही बैठक घेतली जाते. कोविडमुळे यावषी उशिराने बैठक झाली. या बैठकीच्या व्यासपीठावर निवृत्त प्राचार्य एस. वाय. प्रभू, आरएसएसचे विद्याभारती, जिल्हा उपाध्यक्ष रामनाथ नायक, प्रज्ञा प्रवाह, सहकार्यवाह सुशांत जोशी, कंत्राटदार बाळकृष्ण गोडसे, काकडे फौंडेशनचे अध्यक्ष किशोर काकडे उपस्थित होते.
कन्याकुमारीजवळ हिंदू महासागराच्या काठावरील दगडावर विवेकानंदांच्या ज्ञानोदयाला झालेले 150 वर्षांचे महत्त्व व तेथील स्मारकाची माहिती किशोर काकडे यांनी दिली. एस. वाय. प्रभू यांनी लव्ह जिहादवर आपले विचार मांडले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन वेंकटेश शिंदे यांनी केले. आभार संदीप भिडे यांनी मानले. यावेळी राजू गोडसे, पृथ्वीराज काकतकर, नीना काकतकर, संतोष कागवाड, विशाल राऊत, हिमांगी प्रभू, कल्याणी आणि संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.