ऑनलाईन टीम / अयोध्या :
अयोध्येतील राममंदिराला श्री रामजन्मभभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास मणिरामदास छावनीच्या वतीने 40 किलो चांदीची शिळा अर्पण करण्यात येणार आहे. 5 ऑगस्ट रोजी मंदिराच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी वैदिक मंत्रोच्चारासहीत ही शिळा स्थापन करणार असल्याची माहिती महंत नृत्यगोपाल दास यांनी दिली आहे.
नृत्यगोपाल दास म्हणाले, मंदिराच्या उभारणीसाठी प्रत्येकाकडून काही ना काही मदत दिली जात आहे. अनेकांनी शक्य असेल तेवढा मदतनिधी दिला आहे. मी न्यासाचा अध्यक्ष राहिलो आहे, सध्या श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचा अध्यक्षही आहे. त्यामुळे या महायज्ञात आपल्या वतीने समर्पण करण्याची जबाबदारी आम्ही या शिळेच्या स्वरुपात पार पाडत आहोत.
आमची मणिरामदास स्वामी सेवा ट्रस्ट नेहमीच सांस्कृतिक वारसा जपण्याचे काम करत आली आहे, असे नृत्यगोपाल दास यांनी म्हटले आहे.