ललिता शिंदेनी पाठवले पंतप्रधानांना पत्र
ऑनलाईन टीम / मुंबई :
त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवत अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टमध्ये महिलांनां स्थान मिळावे अशी मागणी केली आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट नावाचे विश्वस्त मंडळ स्थापन करण्यात येत असल्याची घोषणा लोकसभेत केली. या ट्रस्टमध्ये 15 सदस्य असणार आहेत.
ललिता शिंदे म्हणाल्या, आज महिला सर्व क्षेत्रात कार्यरत आहेत. सरकारने महिलांसाठी बेटी बचाओ, बेटी पढाओ सारख्या योजना सुरु केल्या आहेत.
त्यामुळे राम मंदिराच्या ट्रस्टमध्ये जे पंधरा सदस्य असणार आहेत. त्या पंधरा सदस्यांमध्ये एक स्थान महिलांसाठी असावे अशी मागणी ललिता शिंदेनी केली आहे.