तरुण भारत ऑनलाईन / अहमदनगर
अहमदनगरमधील जामखेड तालुक्यात भाजपला मोठे खिंडार पडणार आहे. जामखेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांसह दहा नगरसेवक पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. नगराध्यक्ष निखिल घायतडक यांच्यासह दहा नगरसेवक येत्या दोन दिवसात पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करणार असून दोन दिवसांत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. त्यामुळे पवार यांनी माजी मंत्री राम शिंदेंना मोठा धक्का दिल्याचं बोललं जातंय.