वार्ताहर / पुलाची शिरोली
रायगडावर खडा पहारा देण्यासाठी जाणाऱ्या पहिल्या तुकडीतील धारकऱ्यांचा शपथविधी सोहळा मंगळवारी उत्साहात पार पडला. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्ह्यातील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानची श्री रायगडावरील खडा पहारा धारकऱ्यांची पहिली तुकडी निश्चित करण्यात आली आहे. या खडा पाहरासाठी पहिली तुकडी अडीच हजार धारकरी व्यक्तींची आहे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान शाखा पुलाची शिरोली व करवीर तालुका श्री रायगड सुवर्ण सिंहासन खडा पहारा यादी संकलन करण्यात आले व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांच्या कडून खडा पहारा शपथ देण्यात आली.
या शपथविधीसाठी करवीर तालुक्यातील पंधरा व हातकणंगले तालुक्यातील दहा गावे यांची अडीच हजार धारकरीची तुकडीचा फेटा बांधून सन्मान श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान शिरोली यांच्यावतीने करण्यात आला. यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कोल्हापूर जिल्हा प्रमुख ह. भ. प. विठ्ठल पाटील (तात्या) कोल्हापूर जिल्हा कार्यवाहक सुरेश यादव यांच्या उपस्थितीत शपथ देण्यात आली.
या कार्यक्रमासाठी करवीर तालुका प्रमुख नितीन चव्हाण, शिरोली कार्यवाह युवराज चौगले, संग्राम चौगुले, अनिकेत पाटील, युवराज करपे यांनी घेतले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष राजेश पाटील, तंटामुक्त अध्यक्ष सतीश पाटील, शिवसेनेचे अनिल खवरे, शितल पाटील, वैभव चौगुले, महेश पाटील, यांची प्रमुख उपस्थिती होती.