प्रतिनिधी/ खेड
रायगड जिह्यातील अलिबाग-मुरुड मार्गावरील काशीद येथील नाल्यावरील जुना दुचाकी व कारसह वाहून गेल्याची घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. दुर्घटनेत कारमधील 6 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. दुचाकीसह वाहून गेलेल्या विजय चव्हाण (एकदरा-मुरुड) नामक दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर मुरुडकडे जाणारी वाहतूक रोहा-सुपेगाव मार्गे वळवण्यात आली.
रविवारपासून रायगड जिह्यात पावसाचे थैमान सुरू आहे. सायंकाळी पावसाने रौद्ररूप धारण केले. मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी वाढली. पाण्या
च्या वाढत्या प्रवाहामुळे अलिबाग-मुरुड रस्त्यावरील काशिद गावच्या नदीवर असलेला 50 वर्षाचा जुना पूल वाहून गेला. यात एक चार चाकी वाहन व एक दुचाकीही पाण्यात वाहून गेली.
अपघाताचे वृत्त कळताच सर्वच यंत्रणा घटनास्थळी पोहचल्या. तातडीने मदतकार्य हाती घेत वाहून गेलेल्या वाहनांचा शोध सुरू करण्यात आला. कारमधील 6 जणांना बाहेर काढण्यात यश आले. पाण्यात वाहत जाऊन गंभीररित्या जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याचे मुरूडचे नायब तहसीलदार रवींद्र सानप यांनी सांगितले. अलिबाग-मुरुड मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.