प्रतिनिधी / बेळगाव
रायबागमधील चौघा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे रविवारी स्पष्ट झाले आहे.
यासंबंधी सायंकाळी राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये ही
माहिती देण्यात आली आहे. यामध्ये तीन महिलांचा समावेश असून चारही जण
तबलिगी जमातमधून परतले होते.
रायबाग
येथील 67 वर्षीय महिला, 36 वर्षीय महिला, 41 वर्षीय महिला व 40 वर्षीय
युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले आहे. दोन
दिवसांपूर्वी कॅम्प, बेळगुंदी व हिरेबागेवाडी येथील तिघा जणांचे स्वॅब
तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले होते. आता जिल्हय़ातील पॉझिटिव्ह रुग्णांची
संख्या सातवर पोहोचली आहे.
रायबागमधील तीन महिला व एक युवक यांनी 13
ते 18 मार्चपर्यंत निजामुद्दीन परिसरातील जंगलवाले मशिदीत झालेल्या तबलिगी
जमातीच्या धर्मसभेत भाग घेतला होता. 20 मार्च रोजी ते रेल्वेने आपल्या गावी
परतले होते. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.