स्कॅम 1992 च्या माध्यमातून ठरला लोकप्रिय
सोनी लिव्हची वेबसीरिज ‘स्कॅम 1992-द हर्षद मेहता स्टोरी’मुळे लोकप्रिय झालेला प्रतीक गांधी आता स्वतःच्या बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज आहे. प्रतीक यापूर्वीही गुजराती तसेच हिंदी चित्रपटांमधून झळकला आहे. पण नायक म्हणून रावणलीला हा त्याचा पहिला हिंदी चित्रपट असणार आहे. याचमुळे या चित्रपटाला त्याचा पदार्पणातील चित्रपट म्हटले जात आहे.
रावणलीला चित्रपटाचा फर्स्ट लुक मंगळवारी सादर करण्यात आला आहे. पोस्टरवरर प्रतीक अभिनेत्री ऐंद्रिता रेसोबत बासुरीवादनाच्या मुद्रेत दिसून येतो. पोस्टरच्या बॅकग्राउंडमध्येही प्रतीकला रावणाच्या गेटअपमध्येही दाखविण्यात आले आहे.
पोस्टरवर ‘ राम में क्यो तूने रावण को देखा’ असे नमूद आहे. चित्रपटाची पटकथा आणि दिग्दर्शन हार्दिक गज्जर यांचे आहे. हा चित्रपट 1 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे. हा चित्रपट प्रेमकथेवर आधारित असल्याचे समजते. प्रतीक याचबरोबर अतिथी भूतो भव आणि डेढ बीघा जमीन या चित्रपटांमध्येही दिसणार आहे.