वृत्तसंस्था/ रावळपिंडी
येथे शुक्रवार 7 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱया यजमान पाक विरूद्धच्या पहिल्या कसोटीसाठी बांगलादेश संघाची घोषणा करण्यात आली असून वेगवान गोलंदाज मुस्ताफिजुर रेहमानला वगळण्यात आले आहे.
गेल्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या भारताविरूद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी रेहमानचा बांगलादेश संघात समावेश करण्यात आला होता. तथापि पण त्याला सूर मिळत नसल्याचे पाहून त्या दोन्ही कसोटीत खेळविले नाही. मोमीनूल हककडे बांगलादेशचे नेतृत्व राहील. या अगामी कसोटी मालिकेसाठी बांगलादेश संघात सलामीचा फलंदाज कायेस, एस.इस्लाम आणि मेहदी हसन यांना वगळण्यात आले. बांगलादेशच्या या तीन क्रिकेटपटूंनी पाकमधील सुरक्षा समस्येमुळे उपलब्ध राहू शकणार नसल्याचे कळविले होते. त्याचप्रमाणे यष्टीरक्षक आणि फलंदाज एम रहीम यालाही निवड समितीने वगळले आहे. बांगलादेशचा संघ 4 फेब्रुवारीला रावळपिंडीकडे रवाना होईल.
बांगलादेश संघ- मोमीनूल हक (कर्णधार), तमीम इक्बाल, सैफ हसन, नझमूल हुसेन, मेहमूदुल्ला, मिथुन, लिटॉन दास, टी इस्लाम, नईम हसन, इ हुसेन, अबु जायेद चौधरी, अल अमीन हुसेन, रूबेल हुसेन आणि सौम्या सरकार.