रवि. 26 जुलै ते 1 ऑगस्ट 2020
मेष
या सप्ताहात मिथुन राशीत शुक्र, कर्केत बुध प्रवेश करीत आहे. धंद्यात संयमाने वागा. काम मिळेल. जुने येणे वसूल करा. प्रवासात घाई करू नका. नोकरीत कामाचा दबाव राहील. कायदा पाळा. राजकीय, सामाजिक कार्याला खिळ घालण्याचा प्रयत्न होईल. मनावर ताण येईल. प्रकृतीची काळजी घ्या. घरातील कामे होतील. खर्च वाढेल. कला, साहित्य प्रगती होईल.
वृषभ
या सप्ताहात मिथून राशीत शुक्र, कर्केत बुध प्रवेश करीत आहे. धंद्यात वाढ होईल. ओळखीतून चांगले काम मिळेल. जुने येणे वसूल करा. अनाठायी खर्च टाळा. गुंतवणूक विचारपूर्वक करा. नोकरीत प्रभाव राहील. राजकीय, सामाजिक कार्यात प्रगती करता येईल. नियमांचे पालन योग्य प्रकारे करा. घरातील कामे होतील. कला साहित्यात नवे करून दाखवाल.
मिथुन
या सप्ताहात मिथुनेत शुक्र, कर्केत बुध प्रवेश करीत आहे. धंद्यातील समस्या कमी होईल. रेंगाळत राहिलेले काम होईल. नोकरी मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. अचूक निर्णय घ्याल. शेअर्समध्ये गुंतवणूक फायद्याची ठरेल. घरातील वाद कमी होईल. प्रकृती सुधारेल. कायदा पाळून सर्व कामे करा. पुढे जाल.
कर्क
या सप्ताहात मिथुनेत शुक्र, तुमच्याच राशीत बुध प्रवेश करीत आहे. जवळच्या व्यक्तीची काळजी वाटेल. घरात क्षुल्लक वाद वाढवू नका. स्वत:च्या प्रकृतीची काळजी घ्या. धंद्यात नम्रता ठेवा. काम मिळवता येईल. राजकीय, सामाजिक कार्याला नव्याने वेग देता येईल. आपसात वाद वाढवू नका. मैत्रीत सावध रहा. नोकरीत वरि÷ांची मर्जी राहील. कायदा मोडू नका. मोह आवरा.
सिंह
या सप्ताहात मिथुनेत शुक्र, कर्केत बुध प्रवेश करीत आहे. धंद्यात तडजोड करावी लागेल. अरेरावी केक्हाही करू नका. वादाचा प्रसंग टाळा. मारामारी करू नका. कायदा सर्वत्र पाळा. मागील येणे वसूल करा. नोकरीत काम वाढेल. आरोप येऊ शकतो. राजकीय, सामाजिक कार्यात सावधपणे बोला. निर्णय घ्या. योग्य सल्ला घ्या. संसारात वडिल माणसाची चिंता राहील.
कन्या
या सप्ताहात मिथुनेत शुक्र, कर्केत बुध प्रवेश करीत आहे. महत्त्वाची कामे करून घ्याल. धंद्यात वाढ होईल. चर्चा सफल होईल. संसारात शुभ घटना घडेल. नोकरीत टिकून राहता येईल. वजकीय, सामाजिक कार्यात रागावर ताबा ठेवा. तुमचे मुद्दे विचार करण्यासारखे असतील. वरि÷ खूष होतील. लोकप्रियता मिळेल.
तुळ
या सप्ताहात मिथुनेत शुक्र, कर्केत बुध प्रवेश करीत आहे. तुमच्या धंद्यात सुधारणा होईल. एकमेकांतील तणाव कमी होईल. मागील येणे वसूल करता येईल. प्रकृती सुधारेल. नोकरीत वर्चस्व वाढेल. बेकारांना काम मिळवता येईल. राजकीय, सामाजिक कार्यात वेगाने प्रगती करता येईल. प्रयत्न करा. स्थान मजबूत करा. संसारात चांगली घटना घडेल. कला, साहित्यात उत्तम कार्य होईल.
वृश्चिक
या सप्ताहात मिथुन राशीत शुक्र, कर्केत बुध प्रवेश करीत आहे. धंद्यात मोठे काम मिळेल. वसूली करण्याचा प्रयत्न करा. कायदा पाळा. स्वत:च्या खाण्याची काळजी घ्या. घरात काम, तणाव होईल. नोकरीत तुमचे महत्त्व वाढेल. मैत्रीत गैरसमज होऊ शकते. खर्च वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात नव्या पद्धतीने कार्य करावे लागेल. लोकांची नाराजी होईल. मोह टाळा.
धनु
या सप्ताहात मिथुनेत शुक्र, कर्केत बुध प्रवेश करीत आहे. धंद्यात चर्चा करताना काळजी घ्या. कठोर, स्पष्ट बोलणे त्रासदायक ठरेल. घरातील वयोवृद्ध व्यक्तीची काळजी वाढेल. नोकरीत, कामात चूक करू नका, नम्र रहा. राजकीय, सामाजिक कार्यात धावपळ होईल. वरि÷ांची मर्जी पाहून बोला. प्रसिद्धीचा विचार न ठेवता काम करा.
मकर
या सप्ताहात मिथुनेत शुक्र, कर्केत बुध प्रवेश करीत आहे. धंद्यात सुधारणा करताना कुणाला दुखवू नका. कायदा पाळा. स्वत:च्या खाण्यापिण्याची काळजी घ्या. मनावर दडपण राहील. फसगत होईल. नोकरीत वरि÷ांची कामे करून द्याल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमची प्रति÷ा उजळेल. सहकारी वर्गावर नाराज होऊ नका. खर्च अनाठायी करू नका. पटकन विश्वास ठेवू नका.
कुंभ
या सप्ताहात मिथुनेत शुक्र, कर्केत बुध प्रवेश करीत आहे. या सप्ताहात तुमचे मनोबल वाढेल. परंतु नोकरीत, राजकारणात शब्द जपून वापरा. कायदा कुठेही मोडू नका. उतावळेपणा करू नका. प्रति÷ा जपा. धंद्यात तणाव होईल. अरेरावी केल्यास समस्या वाढेल. खर्च वाढेल. डोळय़ांची काळजी घ्या. वृद्धांची काळजी वाटेल. संयम ठेवा. यश मिळवा.
मीन
या सप्ताहात मिथुनेत शुक्र, कर्केत बुध प्रवेश करीत आहे. धंद्यात चांगला निर्णय घेता येईल. भावनेच्या आहारी न जाता निर्णय घ्या. संयम ठेवा. राग आवरा. मागील येणे वसूल करा. नोकरीत वर्चस्व दिसेल. वरि÷ खूष होतील. राजकीय, सामाजिक कार्यात तुम्ही महत्त्वाची कामे करून ठेवा. डोळय़ांची काळजी घ्या. मदत करा. संसारात खर्च होईल. कला, साहित्यात उत्साह वाढेल.