रवि. 2 ते 8 फेब्रुवारी 2020
मेष
मीन राशीत शुक्र प्रवेश, धनु राशीत मंगळ प्रवेश करीत आहे. धंद्यात तुम्हाला मोठे कंत्राट मिळवता येईल. नशीबाची साथ असताना प्रयत्न जोरदार करावे. ओळखीतून अडलेली कामे करून घ्या. शेतकरी वर्गाला नवी दिशा मिळेल. नोकरीत कौतुक होईल. राजकीय, सामाजिक कार्यात डावपेच यशस्वी होतील. सर्वांना सांभाळून घ्यावे लागेल. कला, क्रीडा स्पर्धेत पुरस्कार मिळवाल. कोर्टकेस यशस्वी होईल. संसारात आनंदी व्हाल.
वृषभ
मीन राशीत शुक्र प्रवेश, धनु राशीत मंगळ प्रवेश करीत आहे. धंद्यातील प्रकरण मिटवता येईल. रविवारी तडजोड करावी लागेल. तुमचा अंदाज चुकण्याची शक्मयता आहे. वसूली करून घ्या. नोकरीत जबाबदारीने काम केल्याने वरि÷ खूष होतील. घरातील कामे होतील. घर, जमीन, खरेदी-विक्री फायदा होईल. राजकीय- सामाजिक कार्यात तुम्हाला तत्परता दाखवल्याने कामे पूर्ण होतील. लोकांना खूष ठेवा. कला क्षेत्रात संधी मिळेल. वाहन जपून चालवा.
मिथुन
मीन राशीत शुक्र प्रवेश, धनु राशीत मंगळ प्रवेश करीत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला नोकरीत तणाव होईल. काम वाढेल. राग वाढू देऊ नका. वसूली करून घ्या. धंद्यात काम वाढेल. संसारातील समस्या सोडवता येईल. जीवनसाथीमुळे यांना खूष कराल. प्रवासाचा बेत ठरवता येईल. राजकीय, सामाजिक कार्यात चुका करू नका. संयमाने, विचाराने निर्णय घ्या. स्पर्धा कठीण आहे.
कर्क
या सप्ताहात मीन राशीत शुक्र, धनु राशीत मंगळ प्रवेश करीत आहे. नोकरीत प्रभाव दिसेल. बोलतांना सावध रहा. नोकरांना दुखवू नका. नवे काम धंद्यात मिळवण्याचा प्रयत्न करा. घरातील वाद वाढवू नका. राजकीय, सामाजिक कार्यात विरोधकांना तुमचे बोलणे झोंबेल. गुप्त कारवायांच्याकडे लक्ष ठेवा. कला, क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. कोर्टकेस संपवता येईल.
सिंह
या सप्ताहात मीन राशीत शुक्र, धनु राशीत मंगळ प्रवेश करीत आहे. मुलांसमवेत वाद होण्याची शक्मयता आहे. धंद्यात समतोल राखावा लागेल. प्रवासात दगदग होईल. वसूली करण्याचा प्रयत्न करा. राजकीय, सामाजिक कार्यात असंतोष होऊ शकतो. तुमच्यावर टीका होईल. मानसिक तणाव सप्ताहाच्या शेवटी वाढू शकतो. कला, क्रीडा क्षेत्रात नवीन ओळखी उपयुक्त ठरेल. कोर्टकेस सोपी नाही.
कन्या
या सप्ताहात मीन राशीत शुक्र, धनु राशीत मंगळ प्रवेश करीत आहे. रविवार राग वाढवणारी घटना घडेल. घरातील व्यक्तीची काळजी वाटेल. धंद्यात नवे काम मिळवण्याचा प्रयत्न करा. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाची प्रशंसा होईल. मनाप्रमाणे बदली करता येईल. राजकीय, सामाजिक कार्यात प्रति÷ित व्यक्तींचा परिचय होईल. तुम्ही संयमाने चर्चा करा. स्पर्धा जिंकाल. कोर्टकेस यशस्वी होईल.
तुळ
या सप्ताहात मीन राशीत शुक्र प्रवेश, धनुराशीत मंगळ प्रवेश करीत आहे. शेतकरी वर्गाला नवा विचार सुचेल. काम मिळवण्याचा प्रयत्न करा. घरातील खर्च वाढेल. शेजारी कुरबूर करतील. इतरांना मदत करण्यास वेळ जाऊ शकतो. नोकरीच्या ठिकाणी रागावर ताबा ठेवा. राजकीय, सामाजिक कार्यात व्याप वाढेल. वरि÷ांचा दबाव राहील. गोड बोलून तुमच्याकडून गुपित काढले जाईल. स्पर्धा कठीण वाटेल.
वृश्चिक
या सप्ताहात मीन राशीत शुक्र प्रवेश, धनुराशीत मंगळ प्रवेश करीत आहे. धंद्यात काम मिळेल. भागीदाराच्या बरोबर समतोल राखा. बोलण्यातून वाद होऊ शकतो. नोकरीत वर्चस्व राहील. प्रवासात वाहन हळू चालवा. दुखापत टाळा. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचा अधिकार गाजेल. गुप्त कट रचला जाईल. तुमचे बोलणे जाचक ठरू शकते.
धनु
या सप्ताहात मीन राशीत शुक्र, धनु राशीत मंगळ प्रवेश करीत आहे. साडेसाती सुरू आहे. धंद्याला कलाटणी देणारी घटना घडेल. सोमवार,मंगळवार गुप्त कारवाया होतील. शेजारी कुरापत वाढेल. राग आवरा. कायदा पाळा. नोकरीत वरि÷ खूष होतील. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्या कार्याला दिशा मिळेल. लोकप्रियता मिळेल. कला, क्रीडा स्पर्धेत पुरस्कार मिळवाल. केस जिंकाल.
मकर
या सप्ताहात मीन राशीत शुक्र, धनु राशीत मंगळ प्रवेश करीत आहे. साडेसाती सुरू आहे. धंद्यात वाढ करता येईल. तणावाच्या प्रसंगावर जास्त जोर न देता संयमानेच वागा. अडचणीवर मात करता येईल. मागील येणे वसूल करा. नोकरीत तुमचा प्रभाव पडेल. राजकीय, सामाजिक कार्यात प्रति÷ा मिळेल. गुप्त कारवाया होतील. त्याला कमी समजू नका. स्पर्धा जिंकाल. केस जिंकाल.
कुंभ
या सप्ताहात मीन राशीत शुक्र, धनु राशीत मंगळ प्रवेश करीत आहे. साडेसाती नुकतीच सुरू झाली आहे. धंद्यात काम मिळेल. वसुली करता येईल. शेतकरी वर्गाला नवा प्रयोग यशस्वी करता येईल. नोकरीत सावधपणे निर्णय घ्या. रविवारी रागावर ताबा ठेवा. विरोध होईल. घरातील कामे होतील. अविवाहितांना स्थळे येतील. राजकीय,सामाजिक कार्यात नम्रपणे बोला. भांडण करू नका.
मीन
तुमच्या राशीत शुक्र प्रवेश, धनु राशीत मंगळ प्रवेश करीत आहे. मीन राशीत शुक्र उच्चीचा असतो. धंद्यात वाढ करता येईल. कामगारांना सांभाळून ठेवा. नोकरीत बढती होईल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. आर्थिक सहाय्य योजनेसाठी मिळवता येईल. सोमवार, मंगळवार बोलण्यात चूक करू नका. कला क्षेत्रात विशेष यश संपादन कराल. साहित्य तयार होईल.