मेष
शनि-गुरु प्रभावी आहेत. या काळात महत्त्वाच्या कामांना सुरुवात करावी. शुक्रभ्रमण आर्थिकदृष्टय़ा अत्युत्तम असल्याने सतत पैसा मिळत राहील. पण खर्चालाही धरबंध राहणार नाही. चैनी व अनावश्यक वस्तूंसाठी बराच खर्च कराल. देण्याघेण्यावरून संततीशी मतभेद होऊ शकतील. काळजी घ्या. अमावास्या काही बाबतीत शुभ फलदायक.
वृषभ
अष्टमात गुरु आर्थिक स्थिती चांगली ठेवील. जुनाट समस्यांवर कायमस्वरुपी मार्ग मिळेल. कौटुंबिक स्थिती सुधारेल. शनिचे भ्रमण जीवनाला निराळे वळण मिळण्याची शक्मयता. गेले वर्षभर झालेले काही त्रास कमी होतील, पण गुरुच्या पावित्र्याला बाधा येईल, असे कृत्य करू नका. अन्यथा पुढे त्याचे शुभ परिणाम दिसणार नाहीत.
मिथुन
29 मार्चपर्यंत गुरु प्रभावी आहे. या काळात कोणतेही महत्त्वाचे काम करून घ्या. त्यानंतर गुरुची शक्ती क्षीण होत असल्याने प्रत्येक कामात अडचणी उदभवण्याची शक्मयता आहे. शुक्र-केतू शुभफळ देण्यास समर्थ आहेत, पण व्यसन, भांडण, तंटे, गैरसमज वगैरेपासून दूर रहा. अन्यथा शुभ शुक्राचे फळ मिळणार नाही.
कर्क
राजयोगाचा काळ सुरू आहे. सर्वतऱहेची समृद्धी प्राप्त होईल. घराण्याचे पूर्वसंचित चांगले असेल तर कल्पनाही केला नसाल, अशी श्रीमंती प्राप्त होईल. मंगल कार्यातील अडचणी दूर होतील. नोकरी-व्यवसायासंदर्भातील महत्त्वाचे निर्णय अमावास्येनंतर घ्यावेत. इतरांच्या समस्या निर्माण होतील.
सिंह
चंद्र-गुरुच्या त्रिकोण योगाचा शुभप्रभाव असल्याने मंगलकार्य, नोकरी- व्यवसाय, भाग्योदय व परदेश प्रवासाच्या बाबतीत अडलेली कामे करून घ्यावीत. 29 मार्चनंतर गुरुचा प्रभाव होत आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्य व भाग्योदयात अडथळे येऊ शकतील. आपले म्हणणारेही पाठ फिरविण्याची शक्मयता.
कन्या
पाचव्या शनिची नाराजी राहील. त्यामुळे महत्त्वाची कामे खोळंबतील. कोणतेही काम सांभाळून करावे. किंमती वस्तुची खरेदी-विक्री जपून करावी. सुवर्णालंकार व वस्त्रप्रावरणाचा लाभ होईल. मंगलकार्याच्या दृष्टीने चांगले योग. शनि-मंगळ युती योग, अपघात, दुर्घटना व गैरसमज पसरविणारा आहे. त्यामुळे काळजी घ्यावी.
तुळ
शनि-मंगळ युती चतुर्थात आहे. वाहन, अपघात, पडझड यापासून जपा. विवाह, प्रवास, कर्जप्रकरणे, वाहन खरेदी महत्त्वाच्या वाटाघाटी यासह सर्व महत्त्वाची कामे अमावास्यानंतर करून घ्यावीत. पुढील आठवडय़ात होणारा गुरुचा राशीपालट काही बाबतीत अडचणी निर्माण करण्याची शक्मयता आहे. राशीस्वामी शुक्र सप्तमात शुभ आहे. त्यामुळे आर्थिक अडचणी जाणवणार नाहीत. वैवाहिक जीवन चांगले राहील.
वृश्चिक
शनि-मंगळ युतीमुळे सर्वच गोष्टी मनाप्रमाणे होत नसतात, पण त्यामुळे नाऊमेद न होता कोठे दोष आहेत, हे पहावे. आगामी काही दिवसात तुम्हाला सर्वच बाबतीत चांगले दिवस येणार आहेत, पण गुरुपालट होत असल्याने आर्थिक अडचणी व मुलाबाळांच्या बाबतीत किरकोळ त्रास होण्याची शक्मयता.
धनु
गुरु अनुकूल आहे, तोपर्यंत महत्त्वाची सर्व काम आटोपून घ्या. यश मिळेल. पुढील आठवडय़ात गुरु बलहीन होत आहे. त्यामुळे प्रत्येक कामात निरुत्साह जाणवेल. काही बाबतीत काळजी घ्यावी लागेल. सांसर्गिक रोगापासून जपावे. शुभ योगात असल्याने नव्या संधी येतील. शनि-मंगळ धनस्थानी असल्याने खर्च वाढतील.
मकर
राशीस्वामी शनि बलवान आहे. पण मंगळाच्या युतीत असल्याने शुभाशुभ घटनांचे प्रमाण समसमान राहील. वाहन वगैरे जपून चालवावे. कुणाच्या प्रकरणात चुकूनही मध्यस्थी करू नका. पुढील आठवडय़ात गुरुचा होणारा पालट काही बाबतीत शुभ फलदायक आहे. काही कौटुंबिक समस्यावर मार्ग मिळण्याची शक्मयता आहे. या आठवडय़ात कोणताही निर्णय घेताना घाई करू नका.
कुंभ
शनि-मंगळ युतीमुळे एखाद्या कामासाठी काढून ठेवलेले पैसे दुसऱयाच कामासाठी खर्च व्हावेत. त्यामुळे महिन्याचे बजेट चुकेल. गुरुचे पाठबळही कमी होत आहे. त्यामुळे या आठवडय़ात खर्च व कमाई यांचा ताळमेळ व्यवस्थित ठेवावा लागतो. महत्त्वाची कामे रखडतील. त्यासाठी याच आठवडय़ात कामे पूर्ण करावीत.
मीन
लाभात शनि-मंगळ शुभ आहेत. राशीस्वामी गुरु बलवान आहे. कोणतीही महत्त्वाची आर्थिक कामे करून घ्यावीत, पण मित्रमंडळीमुळे काही समस्या उदभवतील. शुक्र-केतूचे भ्रमण सौख्यप्रद व धनलाभ घडविणारे आहे. उत्पन्नाचे मार्ग मात्र भिन्न असतील. प्रेमप्रकरणे व व्यसने यापासून धोका व नुकसान होण्याची शक्मयता.