रविवार दि.6 ते शनिवार दि.12 डिसेंबर 2020
मेष
या सप्ताहात वृश्चिकेत शुक्र प्रवेश, चंद्र, गुरु त्रिकोण योग होत आहे. धंद्यात अडचणी येतील. महत्त्वाच्या वस्तू नीट सांभाळा. वादविवादाला जास्त महत्त्व दिल्यास नुकसान होईल. प्रकृतीची काळजी घ्या. वाहनाचा वेग कमी ठेवा. राजकीय, सामाजिक कार्याला ‘खो’ घालण्याचा प्रयत्न विरोधक करतील. जवळचे लोक तात्पुरते कट करतील. तुम्ही न चिडता निरीक्षण करा. संयमाने मार्ग मिळेल. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. संसारात चिंता होईल.
वृषभ
या सप्ताहात वृश्चिकेत शुक्र प्रवेश, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. धंद्यात सुधारणा होईल. गोड बोला, नोकरीत वरि÷ांना मदत केल्याने तुमचा प्रभाव वाढेल. नवीन ओळखी होतील. राजकीय, सामाजिक कार्याला दिशा मिळेल. मान, प्रति÷ा मिळेल. पद मिळेल. योजनांना वेगाने पुढे नेता येईल. लोकांच्या भेटी घ्या. संसारातील चिंता कमी होईल. सप्ताहाच्या शेवटी खर्च वाढेल. कला, साहित्य, शिक्षणात प्रगती करता येईल.
मिथुन
या सप्ताहात वृश्चिकेत शुक्र प्रवेश, बुध, हर्षल षडाष्टक योग होत आहे. धंद्यात नम्रता ठेवा. मोहाला बळी पडू नका. कायद्याच्या विरोधात न जाता सर्व कामे करा. नोकरी टिकवा. कठोर, खोचक बोलणे टाळा. राजकीय, सामाजिक कार्यात आरोप येतील. चूक होईल. त्यामुळे बेफिकीरवृत्ती ठेवू नका. आर्थिक व्यवहारात सावध रहा. व्यसन नको. शिक्षणात आडवाटेने यश मिळवण्याचा विचार करू नका. घरातील चिंता वाढू शकते.
कर्क
या सप्ताहात वृश्चिकेत शुक्र प्रवेश, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. तुमच्या धंद्यात वाढ करण्याचा प्रयत्न करा. मोठे काम मिळेल. भेटी घ्या. कर्जाचे काम करता येईल. राजकीय, सामाजिक कार्यात प्रगती करून अधिक मोठे काम करता येईल. ओळखी वाढतील. आर्थिक सहाय्य जमा करता येईल. नोकरीत वरि÷ांना खूष कराल. संसारात सुखद समाचार मिळेल. कला, साहित्य, शिक्षणात यश मिळेल.
सिंह
या सप्ताहात वृश्चिकेत शुक्र प्रवेश, चंद्र, मंगळ प्रतियुती होत आहे. प्रवासात घाई करू नका. धंद्यात सहनशिलता ठेवा. तडजोडीचे धोरण ठेवावे लागेल. नोकरीत वरि÷ांचा दबाव राहील. राजकीय, सामाजिक कार्याला रोखण्याचा प्रयत्न विरोधक करतील. तुमचा निर्णय किती चुकीचा आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न होतील. वादविवादात मागे रहा. संसारात एकटेपणा वाटेल. स्वत:च्या चुकीने तुम्ही समस्या निर्माण केल्या. कला, साहित्य, शिक्षणात मेहनत घ्या.
कन्या
या सप्ताहात वृश्चिकेत शुक्र प्रवेश, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला तणाव होईल. प्रवासात सावध रहा. धंद्यात चर्चा करता येईल. नवे काम मिळवण्याचा प्रयत्न करा. वसुली करा. राजकीय, सामाजिक कार्यात प्रगती होईल. पद मिळेल. लोकांच्या हिताचा निर्णय घेता येईल. नोकरीत वरि÷ांची मर्जी राखाल. संसारात सुखद समाचार मिळेल. प्रेमाला चालना मिळेल. कला, साहित्य, शिक्षणात नवा मार्ग मिळेल.
तुळ
या सप्ताहात वृश्चिकेत शुक्र प्रवेश, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. धंद्यात वाढ करण्याची संधी मिळेल. मागील येणे वसूल करा. नोकरीत प्रभाव पडेल. बेकारांनी नोकरी शोधावी. सप्ताहाच्या मध्यावर किरकोळ तणाव होईल. राजकीय, सामाजिक कार्याला वेगाने पुढे न्या. चर्चा करा. नवीन परिचय फायदेशीर ठरेल. संसारातील उणीव भरून काढता येईल. पला, साहित्य, शिक्षणात मागे राहू नका.
वृश्चिक
या सप्ताहात तुमच्याच राशीत शुक्र प्रवेश, चंद्र, गुरु त्रिकोण योग होत आहे. सप्ताहाच्या शेवटी तात्विक मतभेद होतील. संयम ठेवा. धंद्यात नवे काम मिळेल. ओळखीचा उपयोग करून घ्या. नोकरीत वर्चस्व वाढेल. इतरांच्या कामात मदत करावी लागेल. राजकीय, सामाजिक कार्यात मोठा निर्णय घ्यावा लागेल. संसारात सुखाचे क्षण अनुभवा. कला, साहित्य, शिक्षणात आळस नको. मेहनत घ्या.
धनु
या सप्ताहात वृश्चिकेत शुक्र प्रवेश, चंद्र, गुरु लाभयोग होत आहे. रविवारी तणाव, चिंता, वाढेल. प्रवासात घाई करू नका. कायदा पाळा. रागावर ताबा ठेवा. धंद्यात नम्रपणे बोला. महत्त्वाच्या वस्तू सांभाळा. नोकरीत काम वाढेल. वादविवाद होईल. कामात चूक करू नका. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्याकडे दुर्लक्ष होईल. डावपेच ओळखा. दूरदृष्टी ठेवा. कला, साहित्य, शिक्षणात मेहनत घ्या. निराश होऊ नका.
मकर
या सप्ताहात वृश्चिकेत शुक्र प्रवेश, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. साडेसाती सुरू आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला समस्या येईल. नम्र रहा. धंद्यातील गुंता सोडवता येईल. मोठे कंत्राट मिळेल. वसुली करा. नोकरीत प्रभाव पडेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे वर्चस्व वाढेल. लोकप्रियता वाढेल.वेळेला महत्त्व द्या. मेहनत घ्या. संसारातील तणाव कमी होईल. कला, साहित्य, शिक्षणात प्रगती करा.
कुंभ
या सप्ताहात वृश्चिकेत शुक्र प्रवेश, चंद्र, सूर्य लाभयोग होत आहे. साडेसाती सुरू आहे. धंद्यात वाढ होईल. क्षुल्लक तणावाला जास्त महत्त्व देऊ नका. कायदा पाळा. नोकरीत इतरांच्या कामातील चुका सुधाराव्या लागतील. राजकीय, सामाजिक कार्याला नेटाने पुढे न्या. योजनांना रेंगाळत ठेवू नका. घरातील कामे होतील. कला, साहित्य, शिक्षणात मेहनत घ्या. यश मिळेल.
मीन
या सप्ताहात वृश्चिकेत शुक्र प्रवेश, सूर्य, मंगळ त्रिकोण योग होत आहे. धंद्यात संधी मिळेल. परंतु वादाचे प्रसंग येतील. संयम ठेवा. सहनशीलता ठेवा. विलंब सहन करावा लागेल. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात विरोधकांचा सामना करावा लागेल. नवीन परिचयावर जास्त विश्वास ठेवू नका. संसारात कामे वाढतील. प्रवासात घाई करू नका. कला, साहित्य, शिक्षणात जिद्द ठेवा.