रविवार दि.27 डिसेंबर 2020 ते शनिवार दि.2 जानेवारी 2021
मेष
नवीन वर्षात तुमच्या कार्यात वेगाने प्रगती होईल. प्रयत्न करा. सूर्य, हर्षल त्रिकोण योग, चंद्र, बुध प्रतियुती होत आहे. धंद्यात प्रत्येक दिवस महत्त्वाचा ठरेल. फक्त गोड बोलणाऱया क्यक्तीवर जास्त विश्वास ठेवू नका. नोकरीत तुमचा प्रभाव वाढेल. गैरसमज दूर करता येईल. राजकीय, सामाजिक कार्याला नवे वळण मिळेल. पदाधिकार मिळेल. विरुद्धलिंगी व्यक्तीकडून डावपेच टाकले जातील. संसारात खर्च वाढेल. व्यसनात वेळ दवडू नका.
वृषभ
नवीन वर्षात तुमच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. मेहनत फळाला येईल. या आठवडय़ात फक्त रागावर ताबा ठेवा. वाहन जपुन चालवा. धंद्यात थोडी तडजोड करावी लागेल. वसुली करा. गोड बोला, कामे होतील. नोकरीत कायद्याच्या चौकटीत राहून कामे करा. चूक टाळा. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्या बोलण्यातून वादळ निर्माण होईल. आरोप होईल. संसारात प्रेमाची माणसे मदत करतील. वृद्ध व्यक्तीला सांभाळावे लागेल.
मिथुन
नवीन वर्ष संमिश्र स्वरुपाचे असेल. गुंतवणूक करताना या वर्षात योग्य सल्ला घ्या. सूर्य, हर्षल त्रिकोण योग, चंद, बुध प्रतियुती होत आहे. श्री दत्त जयंतीपासून तुमच्या कामांना अधिक गती मिळेल. धंद्यात वाढ होईल. जास्त मोह ठेवू नका. फसगत टाळा. नोकरीत वरिष्ठांना खूष करता येईल. राजकीय, सामाजिक कार्यातील किचकट समस्या लवकर सोडवण्याचा प्रयत्न करा. लोकांची मने जिंकावी लागतील. संसारात नम्रतेने वागा. खोटय़ा प्रेमात अडकू नका.
कर्क
नवीन वर्षात बऱयाच घटना चांगल्या घडतील. अपेक्षा थोडय़ा कमीच ठेवा. या सप्ताहात मात्र अडचणीवर मात करावी लागेल. योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. सूर्य, चंद्र षडाष्टक योग, चंद्र, शुक्र प्रतियुती होत आहे. गोड बोला. धंद्यात फायदा होईल. वाद वाढवू नका. नोकरीत वरि÷ांचे मत ग्राहय़ धरावे लागेल. राजकीय, सामाजिक कार्यात वादाचे प्रसंग येतील. गर्दीत जाऊ नका. ईश्वरी चिंतन घरी करा.
सिंह
नवीन वर्षात तुम्हाला अनेक प्रश्नावर, अडचणीवर मार्ग शोधावा लागेल. नवे शिकावयास मिळेल. चंद्र, बुध प्रतीयुती सूर्य, हर्षल त्रिकोण योग होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला महत्त्वाची कामे करा. धंद्यात चर्चा यशस्वी होईल. नोकरीत तुमचे महत्त्व वाढेल. जवळचे मित्र नाराजी व्यक्त करतील. राजकीय, सामाजिक कार्यात कठीण समस्या सोडवता येईल. विरोधक त्यांचे म्हणणे खरे करण्याचा प्रयत्न करतील. श्री दत्त जयंतीला गर्दीत जाऊ नका. खाण्याची काळजी घ्या. मौल्यवान वस्तू सांभाळा.
कन्या
नवीन वर्षात प्रगतीची नवी संधी मिळेल. इतरांनी दिलेला सल्ला योग्य असल्यास त्यावर विचार करा. नुकसान टाळा. या सप्ताहात चंद्र, गुरु त्रिकोण योग, चंद्र, बुध प्रतियुती होत आहे. धंद्यात नवीन संधी मिळेल. प्रवासात घाई करू नका. राग आवरा. मागील येणे वसूल करा. नोकरीत काम वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्या कामाचे कौतुक होईल. वरिष्ठांच्या मनातील गैरसमज दूर करता येईल. संसारात मुले आनंद देतील.
तुळ
नवीन वर्षात नवीन अनुभव क्यक्तीच्या संदर्भात येतील. कोणतेही काम करताना कायदा नेहमी पाळा. या सप्ताहात सूर्य,हर्षल त्रिकोण योग, चंद्र, बुध प्रतियुती होत आहे. धंद्यात जम बसवा. गोड बोला. जुने येणे वसूल करा. खर्च वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचा प्रभाव वाढेल. पद मिळेल. नोकरीत वरिष्ठांना खूष कराल. नवीन परिचय होईल. कलेत, साहित्यात चमकाल. शिक्षणात लक्ष द्या.
वृश्चिक
नवीन वर्षात तुम्ही ठरविलेली कामे होतील. विरोधकांना योग्य धडा शिकवता येईल. या सप्ताहात चंद्र, गुरु त्रिकोण योग, चंद्र, बुध प्रतियुती होत आहे. धंद्यात जम बसवा. नवे कंत्राट मिळवा. चर्चा सफल होईल. नोकरीत तुमच्या बुद्धीचे कौतुक होईल. राजकीय, सामाजिक कार्याला नवे वळण देता येईल. विरोधक आक्रमक होतील. संसारात शुभ घटना घडेल. कला, साहित्यात शिक्षणात प्रगती होईल. आळस करू नका.
धनु
नवीन वर्षात प्रत्येक ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल. अनेक समस्या सोडवण्यात यश मिळेल. सूर्य, हर्षल त्रिकोण योग, चंद्र, बुध प्रतियुती होत आहे. या सप्ताहात प्रकृतीची काळजी घ्या. मनावर दडपण येईल. किरकोळ तणाव संसारात होईल. धंद्यात मोठे काम मिळेल. मोहाला बळी पडू नका. नोकरीत प्रगती होईल. मित्र हेवा करतील. राजकीय, सामाजिक कार्यात महत्त्व वाढेल. मुद्दे प्रभावी ठरतील. कला, साहित्य, शिक्षणात प्रसिद्धी मिळेल.
मकर
नवीन वर्षात तुमच्या प्रत्येक कार्याला गती देता येईल. जुना वाद मिटवता येईल. चंद्र, शुक्र प्रतियुती, शुक्र नेपच्यून केंद्रयोग या सप्ताहात होत आहे. या सप्ताहात रागावर ताबा ठेवा. धंद्यात तडजोड करा. तात्पुरत्या अडचणी येतील. संयम ठेवा. नोकरीत वरि÷ांच्या बरोबर गोड बोला. नोकरी टिकवा. राजकीय, सामाजिक कार्यात तटस्थ भूमिका घ्या. इतरांना मदत करताना सावध रहा. प्रसिद्धी विलंबाने मिळेल.संसारात चिंता वाढेल. वृद्धांना सांभाळा.
कुंभ
या वर्षात प्रत्येक वेळा तुम्हाला नव्या परीक्षेला बसावे लागण्याची शक्मयता आहे. आक्रमकता कमी करा. या सप्ताहात सूर्य, हर्षल त्रिकोणयोग, चंद्र, बुध प्रतियुती होत आहे. धंद्यात मोठे काम मिळेल. अडचणी सोडवा. पेमाचे संबंध वाढतील. नोकरीत प्रभाव पडेल. कामाचा व्याप सांभाळावा लागेल. कायदा कुठेही मोडू नका. राजकीय, सामाजिक कार्यात तुम्हाला महत्त्वाची भूमिका निभवावी लागेल. योग्य अभ्यास करा. शिक्षणात मागे राहू नका.
मीन
नवीन वर्ष उत्साहाचे, आत्मविश्वासाचे ठरेल. रेंगाळत कामे ठेवू नका. स्वत: मेहनत घ्या. पैसा सांभाळून ठेवा. या सप्ताहात चंद्र, गुरु त्रिकोण योग, चंद्र, शुक्र प्रतियुती होत आहे. महत्त्वाची सर्व कामे करून घ्या. धंद्यात जम बसेल. वसुली करून घ्या. शेअर्समध्ये फायदा होईल. नोकरीत महत्त्व वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात योजना पूर्ण करता येतील. पद मिळेल. कला, साहित्य, शिक्षणात प्रगती होईल. संसारात शुभ समाचार मिळेल.